कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज
आजचे बाजारभाव

कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज

अकलूज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC अकलूज) ही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक महत्त्वाची संस्था आहे,  या बाजार समितीची स्थापना सहकार महर्षि कै. शंकररावजी नारायणराव मोहिते-पाटील यांनी  २ मार्च १९५० साली केली. बाजार समिती शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य दरामध्ये व्यापार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देते. ही बाजार समिती अकलूज शहरामध्ये स्थित आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमाल तसेच जनावरे विक्रीसाठी योग्य प्लॅटफॉर्म, गोदाम सुविधा, वाजवी दर मिळवून देणारी लिलाव पद्धती, आणि दररोजच्या बाजारभावाची माहिती पुरवते. अकलूज बाजार समितीमध्ये शेतीमाल साठवण्यासाठी सुमारे 7600 मेट्रिक टन क्षमतेची गोदाम व्यवस्था आहे. बाजार समितीचे मुख्य कार्यालय अकलूज येथे असून बाजार समितीचे दुय्यम बाजार पेठ नातेपुते,माळशिरस,वेळापूर,पिलीव, शिंदेवाडी या ठीकाणी आहेत.